रत्नागिरी – व्हाट्सअप स्टेटसवरुन चिंचखरीत दोन गटात राडा, तुंबळ हाणामारी

रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथे व्हाट्सअपच्या स्टेटसवरुन दोन गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.

व्हाट्सअप स्टेटसवरुन दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी उमेश बोरकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली, तर प्रवीण चंद्रकात भाटकर यांनीही मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.

उमेश बोरकर यांच्या तक्रारीत दिपक बोरकर यांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी अमित भाटकर हा आला होता. त्यानंतर व्हाट्सअप स्टेटसवरुन त्याठिकाणी हाणामारी झाली. या हाणामारीत उमेश बोरकर, दिपक बोरकर, गिरीष बोरकर, विशाल बोरकर, सप्तमेश बोरकर, संजय बोरकर जखमी झाले.

फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रवीण भाटकर, स्वप्नील बोरकर, राजकुमार सुर्वे, ओमकार भाटकर, सोहम भाटकर, राजेंद्र भाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण भाटकर यांनी केलेल्या फिर्यादीमध्ये, प्रवीण भाटकर, सोहम भाटकर, राजन भाटकर यांना दहा ते पंधरा लोकांनी धक्काबुक्की करुन मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रवीण भाटकर यांच्या फिर्यादीवरुन दिपक बोरकर, विशाल बोरकर, उमेश बोरकर, संजय बोरकर, सप्तमेश बोरकर, गिरीष बोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या