‘आरण्यक’ छोटय़ा पडद्यावर

प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे ‘आरण्यक’ नाटक आता छोटय़ा पडद्यावर पाहता येणार आहे. महाभारत घडून गेल्या नंतरचा, कुरुक्षेत्राच्या युद्धा नंतरचा काळ ‘आरण्यक’ या नाटकात आहे. धृतराष्ट्र पत्नी गांधारी आणि विदुर यांच्या समवेत आपले उर्वरित आयुष्य जंगलात व्यतीत करायला निघून जातो, तेव्हा धृतराष्ट्र अंतःकरणातील दुःख व्यक्त करतात. पांडवांची माता कुंतीही त्यांच्यात सामील होते आणि मग सर्व पात्र स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी युद्धात काय गमावले आणि काय मिळवले हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. टेलिप्लेमध्ये दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन आणि प्रतिभा मतकरी यांच्या भूमिका आहेत. बुधवार, 22 नोव्हेंबर रोजी एयरटेल थिएटर, डिशटीव्ही रंगमंच ऑक्टिव आणि डी 2 एच रंगमंच ऑक्टिववर हा टेलिप्ले पाहता येईल.