‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री झाली आजी

919

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ही आजी झाली आहे. रवीनाची दत्तक घेतलेली मुलगी छाया हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नुकतंच छाया तिच्या बाळाला घेऊन घरी आली असून त्यांच्या गृहप्रवेशाचा फोटो रवीनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


View this post on Instagram

Thanking the pantheon almighty . The baby comes home !

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

रवीनाने 1995 मध्ये छाया व पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यानंतर 2004 मध्ये रवीनाचे लग्न झाले व तिला स्वत:ची दोन मुलं आहेत. रवीनाने दत्तक घेतलेल्या दोन्ही मुलींची धूमधडाक्यात लग्न लावली आहेत. त्यातील मोठी मुलगी छाया हिने नुकताच बाळाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी रवीनाने छायाच्या डोहाळे जेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या