अभिनेत्री रवीना टंडनची भाजप नेत्यावर टीका!

38

सामना ऑनलाईन । हरियाणा

हरियाणातील भाजप नेत्याच्या मुलाने आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढल्याचं प्रकरण चांगलच गाजतंय. या प्रकरणानंतर हरियाणाचे भाजप उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी पीडित मुलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत. या वक्तव्यामुळे भट्टी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता अभिनेत्री रवीना टंडन हिनेही भट्टी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे की, ‘ते डरपोक आहेत. आपल्या मुलींना सूर्यास्तानंतर कुलूप लावून घरात कोंडून ठेवायलाही हे लोक कमी करणार नाहीत.’

हरियाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याने एका मुलीच्या गाडीचा पाठलाग करून छेड काढल्याचा आरोप आहे. त्यावर पीडित मुलगी एवढ्या रात्री फिरत का होती, असा प्रश्न रामवीर भट्टी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. रवीना टंडननेही ट्वीट करून आपली नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी विकास बराला याला अटक करण्यात आली, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या