बीसीसीआयच्या रडारवर शास्त्री आणि कोहली

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पहिल्या दोन कसोटींत दारुण पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांचा पाय चांगलाच खोलात गेला आहे. आता येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही हारचा सामना करावा लागल्यास ‘बीसीसीआय’कडून रवी शास्त्री व विराट कोहली यांची कसून चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
या आधी हिंदुस्थानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता त्यावेळी कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने हार सहन करावी लागली. त्याप्रसंगी धकाधकीचे वेळापत्रक व अपुरा सराव अशी कारणे टीम इंडियाकडून पुढे करण्यात आली, पण आता टीम इंडियाकडे कोणतेही कारण नाही असे ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

कसोटी मालिकेआधी झटपट क्रिकेट मालिका (ट्वेण्टी-20/वन डे) आयोजित करण्यात याव्यात. तसेच हिंदुस्थान ‘अ’ संघाचा दौराही यावेळी असावा. त्यामध्ये अजिंक्य रहाणे व मुरली विजय यांचा समावेश करण्यात यावा. टीम इंडियाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्यानंतरही पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नाही. त्यामुळे त्यांना याबाबत निश्चितच विचारणा करण्यात येऊ शकते, असे त्यांनी पुढे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या