रवी शास्त्री यांचे मानधन विराटपेक्षा जास्त

785
virat-kohli-ravi-shastri-test

रवी शास्त्री यांनी ‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षकपद राखण्यात यश मिळविले. दोन वर्षांसाठी पुन्हा प्रशिक्षकपद मिळालेल्या शास्त्रीच्या मानधनात 20 टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली आहे. रवी शास्त्री यांना आधी आठ कोटी रुपये मानधन होते. याचाच अर्थ ‘बीसीसीआय’च्या नव्या करारानुसार त्यांचे मानधन जवळपास 10 कोटी रुपये होणार आहे. रवी शास्त्री यांना मिळणारे मानधन ‘टीमइंडिया’चा कर्णधार विराट कोहलीपेक्षा अधिक आहे. ‘बीसीसीआय’च्या नव्या करारानुसार कोहलीला 7 कोटी रुपये वार्षिक मानधन मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या