अश्विन सुस्साट, ४५ कसोटीत २५० विकेट घेण्याचा विश्वविक्रम

61

हैदराबाद – हिंदुस्थानचा सुपरस्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा शतकवीर कर्णधार मुशफिकर रहीमला बाद करीत ४५ कसोटींत जलदगतीने २५० बळी मिळवण्याचा विश्वविक्रम साकारला. अश्विनने आपल्या या नेत्रदीपक कामगिरीने ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यालाही मागे टाकले आहे. लिलीने ४८ कसोटींत २५० विकेट मिळवण्याचा पराक्रम केलाय.

टीम इंडियाच्या ‘हुकमी एक्का’ बनून संघाला आवश्यक त्या वेळेस विकेट मिळवून देणाऱया रविचंद्रन अश्विनने ६ नोव्हेंबर २०११ रोजी कसोटीत पदार्पण केले होते. आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत हैदराबाद कसोटीत अश्विनने प्रथम बांगलादेशचा अष्टपैलू साकीब अल हसनला बाद केले आणि आज कर्णधार मुशमफिकरला यष्टिरक्षक साहाकरवी झेलबाद करीत ४५ व्या कसोटीत ‘सुपरस्टार’ २५० विकेट्स मिळवण्याचा भीमपराक्रम साकारला. डेनिस लिलीने ४८ व्या कसोटीत तर द. आफ्रिकेची ‘आग्यवेताळ’ डेल स्टेनने ४९ व्या कसोटीत २५० विकेट्चा पल्ला गाठला होता.

झटपट २५० विकेट घेणारे कसोटीवीर

आर. अश्विन (भारत) – ४५ सामने
डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया) – ४८ सामने
डेल स्टेन (द. आफ्रिका) – ४९ सामने
अॅलन डोनाल्ड (द. आफ्रिका) – ५० सामने
वकार युनिस (पाकिस्तान) – ५१ सामने
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ५१ सामने
सर रिचर्ड हेडली (न्यूझीलंड) – ५३ सामने
माल्कम मार्शल (वेस्ट इंडिज) – ५३ सामने
इयान बॉथम (इंग्लंड) – ५५ सामने
इम्रान खान (पाकिस्तान) – ५५ सामने
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – ५५ सामने
अनिल कुंबळे (भारत) – ५५ सामने
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – ५५ सामने

आपली प्रतिक्रिया द्या