
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवला जात आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक मोठा विक्रम केला आहे. अश्विनने या मालिकेत पहिला बळी घेताच कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 450 बळींचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अश्विनने कांगारूंचा यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळींचा टप्पा गाठला. यापूर्वी हा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर होता. त्यांना मागे टाकून तो सर्वात जलद 450 बळी घेणारा हिंदुस्थानी ठरला आहे.
अश्विनने आपल्या 89व्या कसोटीतील 167व्या डावात गोलंदाजी करताना ही कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये 450 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा जगातील नववा आणि दुसरा हिंदुस्थानी गोलंदाज आहे.
श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरननंतर 80व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करणारा हिंदुस्थानी ऑफस्पिनर अश्विन आता 450वा कसोटी बळी मिळवणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 बळी घेणारे गोलंदाज पुढीलप्रमाणे –
मुथय्या मुरलीधरन – 800
शेन वॉर्न – 708
जेम्स अँडरसन – 675
अनिल कुंबळे – 619
स्टुअर्ट ब्रॉड – 566
ग्लेन मॅकग्रा – 563
कोर्टनी वॉल्श – 519