टीम इंडियाला धक्का, रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त; शार्दुल ठाकूरला संघात संधी

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने आगामी t20 सामन्यांना तो मुकणार आहे. त्याच्या जागी संघात शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे.

पहिल्या टी-20 सामन्यात 44 धावा करणाऱ्या रविंद्र जाडेजाला फलंदाजी करत असताना स्टार्कचा चेंडू जाडेजाच्या हेल्मेटवर लागला. त्यामुळे जाडेजा दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर टीम इंडियाची गोलंदाजी सुरू झाली तेव्हा जाडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली.

शनिवारी सकाळी जाडेजाच्या दुखापतीचे स्कॅनिंग झाले असून त्यानंतर त्याच्या उपचारांची दिशा ठरविण्यात येणार आहे. टीम इंडियाचे फिजीयो नितीन पटेल हे जाडेजाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या