जादा दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, रवींद्र वायकर यांची मागणी

388

कोरोना रुग्णांकडून जादा दर आकारणाऱया खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी महापालिकेच्या पी-दक्षिण विभागाकडे केली तसेच राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना उपचारांबाबत ठरवून दिलेल्या दरांची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याची सूचनाही त्यांनी केली.

महापालिकेच्या पी दक्षिण विभागातील कोविड रुग्णांची माहिती घेण्याबरोबरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱयांसमवेत बैठक घेतली. कोविड रुग्णांकर उपचार करणारी .रुग्णालये तसेच रुग्णवाहिकांसाठी सरकारने ठरवलेल्या दरानुसारच भाडे आकारण्याचे बंधनकारक आहे. पण तरीही काही रुग्णालये तसेच रुग्णवाहिका जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांची शहानिशा करून त्यांच्याकर कारवाई करा अशी सूचना वायकर यांनी उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्याकडे केली.

गॅसदाहिनी महिनाभरात सुहामार्गावरील शिवधाम या स्मशानभूमीतील गॅसवरील दाहिनी येत्या महिनाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पी दक्षिणचे सहाय्यक आयुक्त क्षीरसागर यांनी दिले. यावेळी रवींद्र वायकर यांच्याहस्ते आरेतील आदिवासींना जीवनावश्यक वस्तू, मास्क, सॅनिटायझर तसेच आर्सेनिक्स गोळ्यांचे वाटप करण्यात आले

आपली प्रतिक्रिया द्या