पीएमसी बँकेचे विलीनीकरण करा; आमदार रवींद्र वायकर यांनी पंतप्रधानांसह वित्तमंत्र्यांकडे मागणी

गेल्या वर्षभरापासून निर्णयाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑप. बँकेच्या (पीएमसी) खातेदारांसाठी शिवसेनेचे जोगेश्वरीचे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर पुढे सरसावले आहेत. देशातील सर्व को. ऑप. बँकांना आरबीआयच्या देखरेखीखाली आणण्यासंदर्भात केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्याची तात्काळ अंमलबजाकणी करुन पीएमसी बँकेच्या विलीनीकरणाबाबत निर्णय घेऊन बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू करुन खातेदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वित्तमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रव्यवहारदेखील केला आहे.

पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने या बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर निर्बंध आणले. त्यामुळे या बँकेतील खातेदारांना स्वकष्टाचे स्वतःच्या हक्काचे पैसे काढताही येत नाहीत. या घोटाळ्याला आता एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेला अन्य बँकेत विलिनीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप कुठलाही निर्णय न घेतल्याने खातेदार हतबल झाले आहेत. या बँकेत पगारदार नोकर, निवृत्त कर्मचारी यांचे पेन्शन, ज्येष्ठ नागरीक, सोसायटय़ांचे खाते आहेत. निर्बंधामुळे त्यांचे हक्काचे पैसे काढणेही त्यांनी कठीण झाले आहे, असे वायकर यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या