उद्योगपतीही आता बँक सुरू करू शकणार; आरबीआयच्या समितीची सूचना

आगामी काळात देशातील उद्योगपती किंवा मोठ्या संस्था बँक सुरू करू शकणार आहेत. आरबीआयच्या एका समितीने याबाबतची शिफारस केली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास उद्योगपती किंवा मोठ्या संस्था बँकेच्या प्रवर्तक बनू शकतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास उद्योगपतींना बँक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

उद्योगपती, मोठ्या संस्था, मोठ्या कंपन्या यांना खासगी बँकेचे प्रवर्तक बनण्याची परवानगी देण्यात येऊ शकते, असे या समितीने म्हटले आहे. तसेच खासगी बँकेतील प्रवर्तकांची भागीदारी 15 टक्क्यांवरून 26 टक्क्यापर्यंत वाढवण्यात येऊ शकते, असेही समितीने सूचित केले आहे. रिजर्व्ह बँकेने बँक लायसनस्यबाबत सूचना आणि प्रस्ताव देण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या या शिफारसीमुळे उद्योगपतींना बँक सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे.

बँक लायसन्सच्या अर्जावर व्यक्तीगत किंवा गटाच्या पात्रदेबाबतच्या निकषांबाबही समितीने सूचना केल्या आहेत. तसेच प्रवर्तक आणि भागधारक यांच्या भागीदारीबाबतच्या नियमांचाही समितीने आढावा घेतला आहे. या समितीने उद्योगपतींना बँकेचे प्रवर्तक बनवण्याची केलेली शिफारस महत्त्वाची आहे. तसेच 50 हजार कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या वित्तीय संस्थांचे ( एनबीएफसी) बँकेत रुपांतर करण्याचाही विचार करण्यात येऊ शकतो, असे समितीने म्हटले आहे. मात्र, त्यासाठी 10 वर्षे संस्थेचे काम असणे आवश्यक असल्याची अट ठेवण्याची सूचनाही समितीने केली आहे.

युनिव्हर्सल बँकिंगसाठी नवे बँक लायसन्स आणि किमान प्रारंभिक गुंतवणूक 500 कोटीहून 1000 कोटी करण्यात यावी, असेही समितीने म्हटले आहे. तर लघु आर्थिक बँकांसाठी 200 कोटींची मर्यादा 300 कोटी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. समितीच्या प्रवर्तकांबाबतच्या शिफारसीला मंजुरी मिळाल्यास देशातील बँकिंग यंत्रणेचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. तसेच उद्योगपती आणि मोठ्या संस्थाना बँक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या