रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, रेपो रेट कायम

38

सामना ऑनलाईन । मुंबई

रिझर्व्ह बँकेने नव्या आर्थिक वर्षाचे पहिले तिमाही पतधोरण जाहीर केले आहे. नव्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट ६.२५ टक्केच राहणार आहे. रिव्हर्स रेपो रेट ६ टक्के करण्यात आला आहे. आधीच्या पतधोरणात रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के होता. रिव्हर्स रेपो रेट वाढवल्यामुळे बाजारातले भांडवल वाढेल आणि चलन तुटवड्याची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या