मराठा बँकेचे कॉसमॉस बँकेत विलीनीकरण, सोमवारपासून अंमलबजावणी

मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी) – आर्थिक अडचणीत आल्याने आरबीआयने निर्बंध लादलेल्या मुंबईतील मराठा सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना खुशखबर आहे. मराठा बँकेचे पुण्याच्या कॉसमॉस सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला आरबीआयने मंजुरी दिली. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.

मराठा बँकेच्या मुंबईत सात शाखा आहेत. बँक आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आल्याने आरबीआयने 2016मध्ये बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्या पार्श्वभूमीवर मराठा बँकेने कॉसमॉस बँकेत विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव आरबीआयला दिला होता. त्याची तपासणी केल्यानंतर आरबीआयने आपल्या अधिकारात त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे मराठा बँकेच्या सातही शाखा सोमवारपासून कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत होणार आहेत.