कर्जाचा हप्ता वाढणार; पुढील आठवड्यात आरबीआय व्याजदर वाढवणार?

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. जनता वाढत्या महागाईने त्रस्त होत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय रिझर्व्ह बँकेची मौद्रिक नीती समितीची पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाढती महागाई नियंणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्ज पुन्हा महागणार आहेत. मौद्रिक नीती समितीची बैठक 6 ते 9 जूनदरम्यान होणार आहे.

एप्रि महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो रेट आणि रिवर्स रेपो रेटमध्ये बदल करण्यात आला नाही. मात्र, मे महिन्यात एणपीसीने तातडीची बैठक घेत आरबीआयने व्याजदरात 0.40 टक्क्यांची वाढ केली. आता पुन्हा 0.40 टक्क्यांनी व्याजदर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

टोमॅटोमुळे महागाई मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. महागाईचा दर 7.1 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे आरबीआयकडून व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिजेलच्या करात कपात करण्यासह कच्चे सोयबीन आणि सूर्यफूलाच्या तेलाच्या आयातीवरील शुल्कमुक्त आणि विमानाच्या इंधनाच्या किमती खाली आणण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत.

महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय ऑगस्ट महिन्यात व्याजदर 0.35 टक्के ते 0.50 टक्के वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. व्याजदरात अशाच पद्धतीने वाढ होत राहिल्यास महागाई आटोक्यात येण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

2022-23 या वर्षात महागाईचा दर 6.8 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महागाईचा हा दर आरबीआयच्या निर्धारीत दराच्या 2 टक्क्यांनी जास्त आहे. महागाई नियंत्रणात आली नाही तर व्याजदरात 5.65 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या रेपो रेट 4.40 टक्के आहे. त्यामुळे वाढत्या महागाईसह कर्जाचे हप्तेही वाढणार आहेत.