श्रावणाची न्यायासाठी रावणाशी लढाई

30

सामना ऑनलाईन । मयूरभंज

न्यायासाठी एका व्यक्तीला ४० किलो मीटरची पायपीट करावी लागली आहे. विशेष म्हणजे म्हाताऱ्या आई-वडिलांना कावडमध्ये बसवून त्यांना ही पायपीट करावी लागली आहे.

कार्तिक सिंह असं या व्यक्तीचं नाव असून ते ओडिशाच्या मयूरभंज येथील रहिवासी आहेत. मोरोदा पोलिसांनी त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आणि २००९ मध्ये १८ दिवसासाठी तुरूंगात डांबले, असा कार्तिक यांचा दावा आहे. तसेच या प्रकारामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. आपल्या आईवडिलांना खांद्यावर घेऊन ते कोर्टात पोहोचले. खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं कोर्टात जाण्यासाठी म्हाताऱ्या आई-वडिलांना एकटं सोडावं लागतं होतं असं कार्तिक यांनी कोर्टात म्हटलं.

नोकरी नाही आणि समाजाच्या बहिष्कारामुळं लग्न जुळत नसल्याचं कार्तिक यांनी सांगितलं. आई-वडिलांची काळजी घ्यायला घरात कोणीही नसल्यानं उच्चशिक्षित असूनही नोकरीसाठी ते शहरात जाऊ शकत नव्हते. कर्ज असल्यामुळे आई-वडिलांचं पोट भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. अखेर आई-वडिलांचे डोळे मिटवण्याआधी आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कार्तिक यांची न्यायालयात पायपीट सुरू आहे. वकील प्रभूदाव मरांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे. पोलिसांमुळे अनेक निष्पाप व्यक्तींना खोट्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या