Photo – सनी लियॉन ते अजय देवगण, कलाकारांची खरी नावे माहितीय का?

बॉलिवूडमध्ये काम करणारे कलाकार आपली नावे ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार बदलत असतात. यातील काही कलाकार यशस्वीही होतात, तर काहींच्या नावापुढे ‘फ्लॉप’चा शिक्काही लागतो. तसेच अनेकदा चित्रपटाचे दिग्दर्शकही त्यांना नाव बदलण्यास सांगतात. आज आपण नेहमीच चर्चेत असणाऱ्या कलाकारांची खरी नावे काय आहेत ते पाहूया…

1. बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांचे खरे नाव ‘इन्किलाब श्रीवास्तव’ आहे. परंतु चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले आणि आज ते ‘बिग बी’ या नावानेही ओळखले जातात.

amitabh-bachchan

2. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या सौंदर्याची आणि फिटनेसची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. नेहमी चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचे खरे नाव अश्विनी शेट्टी आहे.

shilpa-shetty

3. ‘भाईजान’ नावाने परिचीत असणाऱ्या सलमान खान याचे खरे नाव ‘अब्दुल रशीद खान’ आहे.

salman-khan4. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अशी ओळख असलेल्या अक्षय कुमार याचे खरे नाव ‘राजीव हरी ओम भाटिया’ आहे.

akshay-kumar

5. बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण याचे खरे नाव ‘विशाल वीरू देवगण’ आहे.

ajay-devgan

6. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिचे खरे नाव ‘प्रीतम झिंटा सिंह’ असे आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव थोडे बदलले.

preeti-zinta

7. बॉलिवूडचा ‘नवाब’ सैफ अली खान याचे खरे नाव ‘साजिद अली खान’ आहे.

saif-ali-khan

8. पॉर्नस्टार ते बॉलिवूड असा प्रवास करणारी बोल्ड अभिनत्री सनी लियॉन हिचे खरे नाव ‘करनजीत कौर वोहरा’ आहे.

sunny-leone

9. उंचपुरा आणि दमदार शरिरयष्टी असलेला अभिनेता जॉन अब्राहम याचे खरे नाव ‘फरहान अब्राहम’ आहे.

john-abraham

10. नेहमी चर्चेत असणारी बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचे खरे नाव ‘रिमा लाम्बा’ आहे.

mallika-sherawat

आपली प्रतिक्रिया द्या