WOW! अंधारात चमकणारा स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये रोज नवनवीन फोन लॉन्च होत असतात. वेगवेगळ्या फीचर्स आणि किंमतीसह लॉन्च होणाऱ्या फोनवर ग्राहकांच्या उड्याही पडतात. तुम्ही जर ‘जरा हटके’ स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर रिअलमी (Realme) कंपनीने Realme 8 Pro या फोनचा Illuminating Yellow कलर व्हेरिएन्ट हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे.

कंपनीने Realme 8 Pro हा स्मार्टफोन यापूर्वीच हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला होता. मात्र याचा Illuminating Yellow कलर रिलीज करण्यात आला नव्हता. आता मात्र कंपनीने हा कलरही हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला असून ब्लॅक आणि ब्लू रंगासह आता येलो कलरही ग्राहकांसाठी उपबल्ध असणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे बॅक पॅनर अंधारामध्ये चमकते. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीत हा फोन उतरत आहे.

yellow

वैशिष्ट्य –

– 6.4 इंचाजा फुल एचडी + (1080×2400 पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले
– ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 720G प्रोसेसर
– 6 आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज
– 4500mAh ची बॅटरी (50W सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट)

कॅमेरा 

फोनमध्ये एक क्वाड रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8+2+2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

camera

किंमत

Illuminating Yellow कलर मॉडेल दोन व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 17 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 18 हजार 99 रुपये आहे. 26 एप्रिलपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या