…म्हणून साजरा केला जातो फ्रेंडशिप डे

आज मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे. आपल्या सख्या-सुहृदांना शुभेच्छा देऊन आजचा दिवस साजरा केला जातो. पण हा मैत्रीदिवस नेमका कधी, का आणि कुठे सुरू झाला ते मात्र सगळ्यांनाच माहीत असेल असं नाही. ‘फ्रेंडशिप डे’ हा दिवस तारखेनुसार नाही तर, दिवसानुसार साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जी तारीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.

आपल्याकडे अलिकडेच ‘फ्रेंडशिप डे’चे वारे वाहत असले तरी त्याची सुरुवात फार जुनी आहे. ‘फ्रेंडशिप डे’ दक्षिण अमेरिकेतील देशात खासकरून पॅराग्वेत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’चा प्रस्तावही 1958 मध्ये ठेवण्यात आला होता. ज्यानंतर सुरुवातीच्या काळात भेटवस्तू आणि भेटकार्ड देऊन शुभेच्छा देण्यावर भर देण्यात आला होता.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ हिंदुस्थानासोबत दक्षिण अशियातील काही देशही साजरा करतात. काही देश मात्र ‘फ्रेंडशिप डे’ त्यांच्या सोयीच्या दिवशी साजरा करतात. 8 एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. तर, जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्र संघाच्या 27 एप्रिल 2011 ला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत 30 जुलै हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या