गणपती गौराईसाठी खास नैवेद्य : साबुदाण्याच्या न्हेवऱ्या…

2826

pratik-poyrekar-chefगणपतीला नैवेद्यात नवीन काय करावे हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. त्यासाठीच आमचे शेफ प्रतीक पोयरेकर यांनी बनवण्यास सोपा अश्या एका गोड पदार्थाची रेसिपी दिली आहे. खास तुमच्या गणपती गौराईसाठी बनवा शेंगदाणे-साबुदाण्याच्या न्हेवऱ्या…

साबुदाण्याच्या न्हेवऱ्याच्या आवरणाचे साहित्य – 
– 1 वाटी साबुदाणा पीठ, 1 लहान चमचा पिठीसाखर, 1 लहान चमचा तेल,
मीठ चवीनुसार.

शेंगदाण्याच्या सारणाचे साहित्य-
1 वाटी शेंगदाणे, बारीक केलेला गूळ अर्धी वाटी, 1 चमचा तुप, 10 ते 12 काजू, चिमुटभर वेलची पूड

शेंगदाण्याच्या सारणाची कृती- 
1 प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्या. शेंगदाण्याच्या साली काढून ते बारिक कुटून घ्या.
2.नंतर गुळ किसुन एका भांडयात मंद आचेवर तुप टाकुन गुळ वितळवून घ्या.

3. त्यात शेंगदाणे आणि काजु चांगले टाका, मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास त्यात थोड़े पाणी टाका.

4. आणि आपले सारण तयार.
साबुदाण्याच्या न्हेवऱ्याची कृती-

1.साबुदाण्याचे पीठ 1 वाटी पाण्यात एक मिनिटं भिजवा. भिजवलेलं पीठ एका प्लेटमध्ये काढा.
2. त्यात पीठी साखर व मीठ घालून ते व्यवस्थित मळून घ्या.
3. मळलेल्या पीठाचे गोळे करा व तो गोळा केळ्याच्या पानावर किंवा प्लास्टिकवर ठेवून पोळी लाटून घ्या.
4. तव्यावर तेल टाकुन ती पोळी दोन्ही बाजुंनी भाजून घ्या.

5. पोळी भाजली की तिच्या वरच्या भागाच्या अर्ध्या बाजुवर शेंगदाण्याचे सारण टाकुन दूसरी बाजू त्यावर दुमडुन घ्या आणि दोन्ही बाजुनी पुन्हा खरपुस भाजून गरमागरम सर्व्ह करा. शेंगदाणे साबुदाण्याच्या न्हेवऱ्या तयार आहेत.
6. या नेव्हऱ्या उपवासाला देखील चालू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या