चमचमीत रेसिपी चिकन बॉम्ब

3621

गणपती झाले, नवरात्रही संपले. त्यामुळे आता खवय्ये मंडळी नॉनव्हेजवर ताव मारणार हे नक्की. त्यासाठी आज शेफ प्रतीक पोयरेकर यांनी सामनाच्या वाचकांसाठी खास चमचमीत ‘चिकन बॉम्ब’ची रेसिपी आणली आहे. झटपट होणारी ही रेसिपी एखाद्या छोट्या पार्टीसाठी स्टार्टर म्हणून देखील करू शकता. 

साहीत्य : 

चिकनच्या बारिक केलेल्या फोडी, लिंबाचा रस, लाल तिखट, दही, आलं लसूण पेस्ट,  लाल मसाला, गरम मसाला , उभा चिरलेला एक कांदा,  उभी चिरलेली भोपाळी मिरची, चवीनुसार मीठ, तेल, गव्हाचे पीठ

कृती  :

1. बारिक चिरलेल्या चिकनला दही, लिंबाचा रस, लाल तिखट, आलं लसून पेस्ट, दही लावून मॅरिनेट करा. एक दिड तास चिकन फ्रिजमध्ये ठेवा.

2. त्यानंतर चिकनला मायक्रोवेव्हमध्ये ग्रील करून घ्या. जर मायक्रोव्हेव नसेल तर ते तुम्ही तव्यावर शॅलो फ्राय देखील करू शकता.

3. एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकुन त्यात उभा चिरलेला कांदा आणि भोपळी मिरची परतून घ्या. त्यात चिकनचे टुकड़े टाका.

4. चिकन व कांदा परतल्यानंतर त्यात गरम मसाला टाका. लिंबाचा रस टाका व मीठ टाका. तुमचं चिकनचं सारण तयार आहे.

5. गव्हाचे पीठ पाणी व मीठ टाकुन चांगले मळून घ्या.

6या पीठाची छोटी पोळी तयार करा व त्यात चिकनचे सारण भरा. त्याचे गोल गोळे तयार करा. त्याला वरून बटर लावून ते गोळे माइक्रोव्हेवमध्ये 5 मिनिटे शिजवा. ग्रीन चटनीबरोबर सर्व्ह करा चिकनचे बॉम्ब.

7 मायक्रोव्हेव नसल्यास तुम्ही हे चिकनचे गोळे तळूही शकता.

 

आपली प्रतिक्रिया द्या