
गेले 20 वर्षे तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी असलेले रेसेप तैयप एर्देगन हे पुन्हा निवडून आले आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना 52.1 टक्के मते मिळाली तर त्यांचे विरोधक असलेल्या कमाल केलिकदारोग्लू यांना 47.9 टक्के मते मिळाली. ते 2028 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत.
तुर्कस्तानमधील वाढती महागाई, डॉलरच्या तुलनेत घसरलेले चलन आणि भूकंपात 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेल्यानंतर एर्देगन यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. मात्र, तरीही पुन्हा सत्ता काबीज करण्यात एर्देगन यांना यश आले.