इतिहासात अनुभवली नसेल अशा मंदीचे सावट – संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटरेश

1534

चीनच्या वुहान येथून कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाला आणि जगभरातील देश संकटात सापडले आहेत. सुमारे 8 लाख 57 हजाराहून अधिक लोक जगभरात कोरोनाने संक्रमित झाले आहेत, तर मृतांचा आकडा 42 हजारांहून अधिक झाला आहे. संयुक्त राष्ट्रचे महासचिव एंटोनियो गुटरेश यांनी परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करून दिली आहे. त्यांनी या परिस्थितीची इतिहासातील युद्धाशी तुलना केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हे जगासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे, असे एंटोनियो गुटरेश म्हणाले. ते म्हणतात कोरोना व्हायरसने समाजाच्या मुळावर आघात केले आहेत. ज्यामुळे लोकांचे जीवन आणि उपजीविकेवर भयंकर परिणाम झाले आहेत.

कोरोना महामारी संकटामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता असून ही मंदी अशी असेल की याआधी अशी मंदी इतिहासात कुणी पाहिली, अनुभवली नसेल. संयुक्त राष्ट्रच्या महासचिवांनी कोरोना व्हायरस संक्रमणामुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर होणाऱ्या परिणामांच्या शक्यतांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

जगभरात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण अमेरिकेत आहेत. तब्बल 1 लाख 88 हजाराहून अधिक लोक अमेरिकेत कोरोना संक्रमित आहेत. तर 3 हजार 800 हून अधिक कोरोनाग्रस्त मृत्युमुखी पडले आहेत.

इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. इथे 12 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे अमेरिका आणि इटली मध्ये मृतांचा आकडा चीन पेक्षा अधिक आहे. अमेरिकेत दर चार नागरिकांपैकी 3 जण लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. स्पेन मध्ये देखील परिस्थिती गंभीर आहे. स्पेन मध्ये 8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या