
शेफ प्रतीक पोयरेकर यांनी आज लहान मुलांना आवडेल तसेच पौष्टीक अशी चिकन आणि बाजरीच्या रोल्सची रेसिपी दिली आहे.
साहित्य :
बाजरीची चपाती तयार करण्यासाठी – 1 कप बाजऱ्याचे पीठ, 1 मोठा चमचा मैदा, चवीनुसार मीठ, गरजेपुरते पाणी
चिकनचे स्टफिंग – पाव किलो चिकन, उभा पातळ चिरलेला कांदा, उभी चिरलेली भोपळा मिरची, बारीक चिरलेली लसुन, बारीक चिरलेले आले, एक चमचा धने पावडर, एक चमचा जीरा पावडर, एक चमचा लाल तिखट, चिमुठभर हळद, चवीनुसार मीठ,
पुदीना आणि कोथिंबीरची चटनी – कोथिंबीर, पुदीना, दही, चवीनुसार मीठ
कृती
– प्रथम चिकन बारिक चिरून घ्या व त्याला आलं, लसुन आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवा.
– बाजरीच्या चपातीचे साहित्य एकत्र करून व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर तयार पीठाचे लहान गोळे करून त्याची पोळी लाटून घ्या.
– गरम तव्यावर तेल किंवा लोणी टाकुन पोळी दोन्ही बाजून व्यवस्थित शेकून घ्या.
– भांडयामध्ये तेल किंवा लोणी टाकुन त्यात प्रथम बारिक चिरलेले चिकन शिजवुन घ्या.
– चिकन हलकं परतलं की त्यात कापलेले कांदे आणि भोपळा मिरची घाला. व्यवस्थित परता.
– वरून सर्व मसाले टाका.
– चिकन व कांदा शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
– त्यात कोथिंबीर घाला
– चटनीचे सर्व साहीत्य मिक्सरमध्ये टाकून बारिक वाटून घ्या.
– बाजारीच्या चपातीवर चिकनचे मिश्नण पसरवा व त्याचे रोल तयार करा
– पॅनवर तेल किंवा लोणी टाकुन ते रोल खसपूस भाजून घ्या