अंडाकरी

558

साहित्य : १ चमचा तेल, २ कांदे बारीक चिरून, ८-१० टोमॅटो, जिरे पावडर, १ चमचा हळद, ५ अंडी, चवीनुसार मीठ, ५-६ हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर

कृती : सर्वप्रथम एका पातेल्यात थोडेसे तेल तापवावे. त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. नंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालावी आणि वरून जिरे पावडर, हळद, चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित उकळी येऊ द्यावी. त्यानंतर यामध्ये अंडी फोडून घालावी. नंतर बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालावी. पुन्हा उकळी येऊ द्यावी. गरमागरम टोमॅटो-अंडा करी गरम भात किंवा ब्रेडबरोबर सर्व्ह करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या