टेस्टी सँडविच

साहित्य ः

एक मोठी वाटी उकडलेले वाटाणे, तीन किसलेले उकडलेले बटाटे, कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा रस्सा पावडर, पाव चमचा धणे पावडर, ४ मोठी इडलिंबे साले काढलेली, पाव चमचा लाल मिरची पावडर, दोन चमचे तेल, ब्रेडचे ६ स्लाईस, थोडे लोणी आणि चवीपुरते मीठ.

कृती ः

सर्वप्रथम कढई गरम करून त्यात थोडे तेल घाला. ते चांगले गरम झाले की त्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. मग त्यात इडलिंबांचे तुकडे, रस्सा पावडर, उकडलेले वाटाणे, लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि मीठ घाला. बटाटय़ांचा लगदा करून वाटाण्यांसह ते दोन-तीन मिनिटे शिजवून घ्या. सर्व मिश्रण शिजले की ते थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यांना लोणी लावा. त्यातील एका ब्रेडवर वरील मिश्रणही नीट रचून त्यावर दुसरा स्लाईस ठेवा. नीट कापून सॅण्डवीच सर्व्ह करा.