दहीवडा

372

साहित्य : ५०० ग्रॅम उकडलेले बटाटे, १०० ग्रॅम पनीर, ५०० ग्रॅम मैदा, ५० ग्रॅम खोबऱ्याचा कीस, २५ ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, दोन-तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा बडीशेप, चवीनुसार मीठ, व अर्धा चमचा लाल मिरचीची पूड, २५ ग्रॅम गूळ, २५ ग्रॅम चिंच, आले, अर्धा चमचा लाल मिरचीची पूड, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा तूप.

कृती : सर्वप्रथम मैदा, मीठ, बटाटा व पनीर एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या. त्या गोळ्यांच्या आत खोबऱ्याचा कीस भरून पुन्हा त्यांना गोल करून घ्या. कढईत तेल गरम करण्यास ठेवा. तेल चांगले तापल्यावर एक-दोन गोळे गरम तेलात टाकावे व राखाडी रंगाचे होईस्तर ते तळावे.

(चटणीसाठी) : गूळ व चिंच अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. चांगल्या पद्धतीने ते भिजल्यानंतर त्याला कुचकरून घ्या. गॅसवर ठेवलेल्या कढईत चमचाभर तूप टाकून त्यात जिरे टाका व त्यानंतर त्यात गूळ व चिंचेचे पाणी टाका. लाल मिरचीची पूड व मीठ टाकून त्याला चांगले फेटून घ्या. दही ऐका कापडात घेऊन त्यातील पाणी नितारून घ्या. वडे प्लेटमध्ये ठेवा व त्यावर दही व तयार केलेली गूळ व चिंचेची चटणी टाका. चवी व आवडीनुसार लाल मिरचीची पूड घ्या. शाही दहीवडय़ांवर बारीक केलेल्या हिरवी मिरची व कोथिंबीर टाका.

आपली प्रतिक्रिया द्या