गूळ पापडी

224

साहित्य : तीळ, गूळ, गव्हाचं पीठ, तूप, वेलची, जायफळ

कृती : मंद गॅसवर कढई तापवून घ्यावी. त्यामध्ये तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावेत. तीळाबरोबर खसखसही घेऊ शकता. हलकासा सोनेरी रंग तिळाला आला की, गॅस बंद करायचा. एका ट्रेला थोडंस तूप लावून घ्यायचं. त्यावर भाजलेले तीळ पसरवून घालायचे. या तीळावर गूळ पापडी थापायची आहे. ट्रेमध्ये व्यवस्थित तीळ पसरवून ठेवल्यानंतर सम प्रमाणात गव्हाचं पीठ, तूप आणि गूळ घ्यायचं. एक कप तूप वितळवून त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचं. गुळाची पापडी बनवण्यासाठी शक्यतो थोडसं जाडसर पीठ घ्यायचं. मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे हे पीठ खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं. पातळसर होईल एवढं पीठ भाजून घ्यायचं. या गव्हाच्या पिठात गूळ किसून घालायचा. यामध्ये वेलची आणि पाव चमचा जायफळ घालायचं. पुन्हा एकत्र भाजून घ्यायचं. गव्हाच्या पिठात गूळ एकजीव व्हायला हवा. ३-४ मिनिटात गूळ वितळेपर्यंतच शिजवायचं. हे मिश्रण तीळ पसरवलेल्या ट्रेमध्ये पसरवून घालावे. वरून सर्व बाजूंनी दाब द्यावा. ५ मिनिटांनंतर याच्या वड्या पाडायच्या. थंड झाल्यावर एक-एक वडी ट्रेमधून बाहेर काढायची.

आपली प्रतिक्रिया द्या