चटक मटक ः तवाभाजी

460

तवाभाजी

साहित्य : बटाटे उकडून त्याचे उभे लांबट जरा पातळ काप करावेत, ढोबळी मिरची, वांगी, कारलं,भेंडी, पडवळ, फ्लॉवर यासारख्या भाज्या असतील तर त्या उभट, लांबट कापून त्याचे तुकडे करावेत, वरच्या भाज्यांच्या प्रमाणात कांदा एकदम बारीक कापलेला, टोमॅटो दोन-तीन किसलेले, आलं-लसूण पेस्ट, कांदेही उभे चिरून, पावभाजीचा चाट किंवा गरम मसाला, हिरवी मिरची पेस्ट तेल (थोडी जास्त वापरावी.), पनीर असल्यास, चवीपुरतं मीठ.

कृती : सर्वप्रथम प्रत्येक भाजी तळून घेऊन बाजूला ठेवावी. उरलेल्या तेलात आधी कांद्याचे तुकडे तळून घ्यावेत. पनीरही तळून घ्यावं, बाजूला ठेवावं. चिरलेला कांदा एकदम लाल परतून त्यात किसलेले टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट घालावी. हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून मीठ टाकावं आणि व्यवस्थित परतावं. घरात असलेल्या सर्वात मोठय़ा तव्यावर मध्यभागी थोडं तेल घालून त्यावर हवा असलेला मसाला टाकावा. त्यानंतर तव्यावर बाजून सगळ्या तळलेल्या भाज्या वेगवेगळ्या ओळीनं लावाव्यात. पानात वाढतेवेळी गॅस मोठा ठेवून हवी असलेली भाजी मसाल्यात आणि तव्यात असलेल्या तेलात बुडवून किंचित तळून गरमागरम वाढावी. वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीरही घालावी.

आपली प्रतिक्रिया द्या