मॉर्गन झाला ‘सिक्सर किंग’, 17 षटकार ठोकत केला विश्वविक्रम

morgan

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर यजमान इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात सामना रंगला. या लढतीत इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने तुफानी खेळी करत 71 चेंडूत 148 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने 17 षटकारांची आतिषबाजी केली. एक दिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मॉर्गनने आपल्या नावावर केला आहे.

एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम याआधी तीन खेळाडूंच्या नावावर होता. हिंदुस्थानचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा ‘360’ खेळाडू एबी डीव्हिलिअर्स आणि वेस्ट इंडीजचा ‘विस्फोटक’ फलंदाज ख्रिस गेल यांनी एका डावात 16 षटकार ठोकले होते. हा विक्रम आता मॉर्गनने आपल्या नावावर केला आहे.