संभाजीनगरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53.42 टक्क्यांवर

634

संभाजीनगरमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या उपचार केंद्रांमध्ये चांगल्या प्रकारचे उपचार घेऊन कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे संभाजीनगरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण 1301 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तब्बल 695 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे प्रमाण एकूण संख्येच्या 53.42 टक्के इतके आहे.

संभाजीनगर शहरात 15 मार्च रोजी एक प्राध्यापिका कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. ती संभाजीनगरमधील कोरोनाची पहिलीच रुग्ण होती. त्यानंतर 27 एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर 27 एप्रिलपासून 25 मेपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1301 वर पोहचली आहे. मात्र, या महिनाभरानंतर गेल्या 5 दिवसांत रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होत आहे. ही दिलासादायक बाब असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 55 वर पोहोचली असून हे प्रमाण एकूण संख्येच्या 4.22 टक्के आहे.

आपली प्रतिक्रिया द्या