रिकव्हरी रेट वाढला… राज्यात अडीच लाख रुग्ण कोरोनामुक्त

727
corona-new

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 60.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत अडीच लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज एका दिवसात 7543 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

कोरोना चाचण्यांना वेग आल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात 10 हजार 320 कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर 265 रुग्णांची कोरोनाविरुध्दची झुंज अपयशी ठरली. राज्यातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 4 लाख 22 हजार 118 इतकी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या 1 लाख 50 हजार 662 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 56 हजार 158 झाली आहे. 21 लाख 30 हजार 98 नमुन्यांची चाचणी आतापर्यंत करण्यात आली. त्यातील 19.81 टक्के म्हणजेच 4 लाख 22 हजार 118 नमुने पॉझिटिव्ह आले. राज्यभरात 8 लाख 99 हजार 557 नागरिक घरामध्ये क्वारंटाईन आहेत तर 39 हजार 535 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत 87 हजार कोरोनामुक्त
मुंबईत आज कोरोनाचे 1,100 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 53 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 689 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 87 हजार 74 वर पोहोचली आहे.

मुंबईत 53 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 350 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर आले आहे तर रुग्ण वाढीचा दरही वाढून 76 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून आता 20 हजार 569 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 26 हजार 982 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 14,287 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या