पुनर्बांधणी इमारतींमधील फिटनेस सेंटरला मिळणार निवासी दरात पाणी

327
fitness-new

पुनर्बांधणी केलेल्या इमारतींमधील फिटनेस सेंटरला आता निवासी दरात पाणी मिळणार आहे. याबाबत आज स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाली. याआधी विकास नियम क नियमावली अंतर्गत चटई क्षेत्र निर्देशांकात सूट देऊन मंजूर केलेल्या फिटनेस सेंटरना पाणीपुरकठ्यासाठी व्यावसायिक दर आकारण्यात येत होते. मात्र जल आकार नियमावलीमधील सुधारित नियमानुसार यापुढे दर आकारले जातील.

फिटनेस सेंटरला विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे एफएसआयनुसार सकलत देण्यात आली आहे. पुनर्विकास करणार्‍या इमारतींमध्ये विकासक किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था विशिष्ट क्षेत्रफळ असलेली जागा फिटनेस सेंटरसाठी आराखड्यात मंजूर करून घेतात. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वास्तक्याचे प्रमाणपत्र मिळवताना या सेंटरचे हस्तांतरण गृहनिर्माण संस्थेस देण्याबाबत हमीपत्र सादर कराके लागते. या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जलजोडणीसाठी अर्ज केला जातो. मात्र जलआकार नियमावलीत स्कतंत्र तरतूद नसल्यामुळे प्रतिहजार लिटरसाठी 50 रुपये 99 पैसे आकारले जातात. याकर आक्षेप घेत फिटनेस सेंटरला निकासी दरात पाणीपुरवठा करण्याची मागणी नगरसेवक गणेश खणकर यांनी केली होती. बोरिवली पूर्व येथील हेमगिरी को-ऑप.सो.मधील फिटनेस सेंटरला वाणिज्य दरात जल आकार भरावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते. मात्र सुधारित जल आकार नियमावली नियम क्र. 1.1(1) जी अनुसार प्रति एक हजार लिटरसाठी आता 5 रुपये 9 पैसे आकारले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या