डिलिव्हरी बॉयसाठी तरुणाने उभारले रिलॅक्स स्टेशन, सिद्धेश लोकरेची कौतुकास्पद कामगिरी

मुंबईच्या सिद्धेश लोकरे नावाच्या कन्टेंट क्रिएटरने मेहनती डिलिव्हरी बॉयसाठी मिनी रिलॅक्स स्टेशन तयार केले आहे.

बरेचदा असे होते की, आपल्याला भूक लागते आणि घरी काही करायचा मूड नसतो. आपण झटकन मोबाइल हातात घेतो आणि ऍपवरून खाण्याची ऑर्डर करतो. बाहेर पाऊस पडत असतो. डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात खाणे घेऊन घरी येतो. ग्राहकांना वेळेवर ऑर्डर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधी कडक उन्हात, मुसळधार पावसात उपाशीपोटी काम करत असतात.  सिद्धेश लोकरे याने या सर्वांना अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे. सिद्धार्थने डिलिव्हरी बॉयसाठी मिनी रिलॅक्स स्टेशन तयार केले आहे. रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्टॉलमध्ये डिलिव्हरी बॉय दोन घटका निवांत होतात. सिद्धेशच्या या उपक्रमाचे नेटिजन्स कौतुक करत आहेत.

समोसा, चहा, पाणी अन् रेनकोट देतोय मोफत

सिद्धेश लोकरेने एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याने आपल्या उपक्रमाची माहिती देणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, मी खऱया हीरोंसाठी एक रिलॅक्स स्टेशन तयार केले आहे. या लोकांबरोबर संवाद साधताना, त्यांची कामाप्रति असलेली निष्ठा आणि उत्कटता मला जाणवली. पावसाळा असो की उन्हाळा असो, ते जे करतात ते करायला त्यांना आवडते.