‘सरकार-३’चा दुसरा ट्रेलर रिलीज

15

सामना ऑनलाईन । मुंबई

राम गोपाल वर्माचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘सरकार-३’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सरकार या चित्रपट मालिकेत अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं वर्चस्व याही चित्रपटात जाणवत आहे. त्यांची ‘अँग्री यंग मॅन’वाली प्रतिमा ‘सरकार-३’च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री यामी गौतम ही या चित्रपटाचं एक मुख्य आकर्षण असणार आहे. या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी आणि जॅकी श्रॉफही तगड्या भूमिकांमध्ये दिसून येत आहेत. एकूणच ‘सरकार-३’ चा रामू फॉर्म्युला बराच उत्कंठावर्धक असणार आहे.

पाहा ‘सरकार-३’चा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या