‘रिलायन्स डिजीटल’च्या वतीने डिजीटल इंडिया सेलची घोषणा; ऑफर्स, मोठ्या सवलती आणि बरेच काही

reliance

रिलायन्स डिजीटल 26 जुलै रोजीच्या इंडिया बिगेस्ट सेल – द डिजीटल इंडिया सेल लॉन्चकरिता सज्ज आहे. हा सेल सर्व रिलायन्स डिजीटल आणि माय जिओ स्टोअर्स तसेच www.reliancedigital.in वर लाईव्ह असेल. ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विस्तृत श्रेणीवर धमाल डिल्सचा आनंद मिळणार आहे. तसेच 22 जुलै ते 5 ऑगस्ट 2021 पर्यंत एसबीआय क्रेडीट कार्डवर किमान रु. 10,000/- पर्यंतचा व्यवहार केल्यास खात्रीशीर 10% कॅशबॅक* मिळू शकतो. याद्वारे एसबीआय क्रेडीट कार्ड व्यवहारांवर रु. 5,000/- ची बचत करणे शक्य आहे. ही ऑफर एसबीआय क्रेडीट कार्ड इएमआय व्यवहारांवर उपलब्ध आहे. टेलिव्हिजन, होम अप्लायन्स, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि असेसरीज यासारख्या उपकरणांच्या विस्तृत श्रेणींवर खास ऑफर उपलब्ध आहेत.

स्मार्टफोन प्रकारात ग्राहकांना सवलती आणि आकर्षक कॅशबॅक मिळवणे शक्य आहे. 31 जुलैपर्यंत काही निवडक फोनच्या खरेदीवर अॅक्सिडेंटल डॅमेज आणि लिक्विड डॅमेज कव्हरेज उपलब्ध आहे. 28 जुलै रोजी लॉन्चनंतर सर्वाधिक पसंती लाभलेला वनप्लस नॉर्ड 2 स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. याशिवाय बाजारातील सर्वाधिक ग्राहक पसंती लाभलेले अॅपल वॉच सिरीज 6 सेल्युलर 44 एमएम आणि सॅमसंग गॅलेक्सी अॅक्टीव्ह 2 आकर्षक किंमतीत उपलब्ध होतील. या ब्रँडचे नवीन स्मार्टवॉच फायर-बोल्ट अग्नि एसपीओ 2 वैशिष्ट्यासह रु. 2,599/ च्या खास किंमतीत डिजीटल इंडियावर उपलब्ध होणार आहे.

लॅपटॉप प्रकारात ग्राहकांना रु. 14,990/- पर्यंतचे लाभ मिळवता येतील, शिवाय बँक कॅशबॅक आणि ब्रँड वॉरंटी ऑफर राहील. आसूस 10 जेन आय5 गेमिंग लॅपटॉप, 16 जीबी रॅम आणि 4 जीबी एनव्हीडिया जिफोर्स जीटीएक्स 1650 ग्राफिक्ससह रु. 64,999/- च्या विशेष किंमतीत उपलब्ध राहील. त्याशिवाय मॅकबुक प्रो विद्यार्थी व शिक्षकांकरिता रु. 7000/- विशेष एचडीएफसी कॅशबॅकसह रु. 1,12,990/- किंमतीत उपलब्ध असेल. ग्राहकांना रु. 16,999/-* पासून सुरू होणाऱ्या किंमतीत थीन अँड लाईट लॅपटॉप खरेदीची संधी मिळणार आहे. 26 जुलै व 27 जुलै रोजी थीन अँड लाईट लॅपटॉपवर विशेष सवलती उपलब्ध असतील.

अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आकर्षक ऑफर्स असणार आहेत. रु. 12,990/-* पासून पुढे किंमतीत 32” स्मार्ट टीव्ही उपलब्ध असेल. रु. 11,990* पासून सुरू असणाऱ्या किंमतीत डायरेक्ट-कूल रेफ्रिजरेटर उपलब्ध होणार आहेत, सोबतच रु. 1,999/-*चे फ्रिबीज मिळतील. रु. 13,290/-* पासून पुढील किंमतीत टॉप-लोड वॉशिंग मशीन, सोबतच रु. 1,999/-*चे फ्रिबीज उपलब्ध होतील. त्याशिवाय रु. 1,199/-*च्या खास किंमतीत रु. 3,498/- किंमतीचा ब्रेकफास्ट कॉम्बो (सँडविच मेकर आणि इलेक्ट्रीकल केटल) उपलब्ध होणार आहे.

यंदा सुलभ वित्तीय आणि ईएमआय पर्यायांसह डिजीटल इंडिया सेल अधिकच लाभदायक ठरणार आहे. ग्राहकांकरिता त्यांच्या नजीकच्या स्टोअर्समध्ये इन्स्टा डिलिव्हरी* (3 तासांहून कमी कालावधीत डिलीव्हरी) आणि स्टोअर पिक-अप* पर्याय उपलब्ध असतील. ग्राहक तसेच कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेस्तव सर्व स्टोअर आणि डिलिव्हरी भागीदार हे कोविड-सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. *सर्व ऑफर आणि किंमतींवर अटी आणि शर्थी लागू असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या