शनिवार, 22 जून रोजी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क (RCP) येथे 900 मुलांनी रिलायन्स फाऊंडेशनद्वारे आयोजित केलेला अनोखा ऑलिम्पिक दिवस साजरा केला. यामध्ये IOC च्या लेट्स मूव्ह इंडिया या उपक्रमाचा भाग म्हणून एक विशेष कार्निव्हल आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये स्वयंसेवा आणि खेळ या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आले होते.
सहावेळा हिवाळी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवा केशवन यांच्यासोबत भेट आणि शुभेच्छा सत्र हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. त्यांनी आपले अनुभव यावेळी मुलांना सांगितले आणि उत्कृष्टता, आदर आणि मैत्री यासारख्या प्रमुख ऑलिम्पिक मूल्यांच्या महत्त्वावर जोर दिला. केशवन यांनीही मुलांसोबत खास ‘मूव्ह अँड ग्रूव्ह’ सत्रात भाग घेतला.