महिलांचा संवाद सेतू, नीता अंबानींनी लाँच केला ‘हर सर्कल’ डिजिटल मंच

जागतिक महिलानी दिनाचे औचित्य साधून रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी समस्त महिलांसासाठी ‘हर सर्कल’ हा डिजिटल नेटवर्किंग मंच सुरू केला आहे. हा मंच महिलांना सुरक्षित संवाद आणि परस्पर समन्वय साधण्यास उपयुक्त ठरणार आहे. ‘हर सर्कल’  वरून महिलांसंबंधित माहिती प्रकाशित होणार आहे.

तसेच महिलांना तज्ञांशी थेट संवाद साधता येईल सोशल मीडियाचा वापरही करता येईल. दिवसरात्र सुरू राहणारे हे महिलांचे नेटवर्क म्हणजे डिजिटल क्रांती असल्याचे नीता अंबानी यांनी सांगितले.

‘हर सर्कल’ हे वेबसाईट आणि ऍप अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. ते गुगल प्ले स्टोअर आणि माय जियो ऍपवरून मोफत डाऊनलोड करता येईल. त्यावरून महिलांना दैनंदिन गरजांसंबंधी माहिती मिळेल. तंदुरुस्ती, आर्थिक, व्यक्तिमत्व विकास, सौंदर्य , फॅशन, मनोरंजन, एनजीओ अशा विविध क्षेत्रांशी संबंधित माहिती मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या