रिलायन्सचे ‘मिशन अन्नसेवा,3 कोटी लोकांच्या जेवणाची सोय

रिलायन्स फाउंडेशनने ’मिशन अन्नसेवा’ योजनेतंर्गत देशातील अल्पभूधारक आणि वंचित समाजातील तीन कोटी लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. ‘मिशन अन्नसेवा’ योजनेअंतर्गत हिंदुस्थानातील अल्पभूधारक आणि वंचित समाजांना तीन कोटींहून अधिक जेवण उपलब्ध करून दिले आहे.

रिलायन्स फाउंडेशनने यापूर्वीच 16 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 68 जिह्यात 2 कोटीहून अधिक जेवण वितरित केले आहे.  फाऊंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, ‘कोविड-19 हा गंभीर साथीचा रोग आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या लोकांसाठी रिलायन्स फाऊंडेशनने मिशन अन्नसेवा सुरू केली आहे. सर्व गरजूंना जेवण देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत रिलायन्स फाऊंडेशन लोकांना शिजवलेले जेवण, खाण्यास तयार असलेली पाकिटे आणि कोरडे रेशन किट आणि सामुदायिक स्वयंपाकघरांना मोठय़ा प्रमाणात रेशन पुरवित आहे. कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांमध्ये रोज वेतन मिळवणारी व्यक्ती, झोपडपट्टीवासीय, कारखाना कामगार आणि वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांचे रहिवासी यांचा समावेश आहे. हे कनिष्ठ वैद्यकीय कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा दलासारख्या अग्रभागी कामगारांना जेवणही पुरवित आहे. काही ठिकाणी रिलायन्स फाउंडेशन रिलायन्स रिटेल दुकानात रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट सुपरस्टोअर, रिलायन्स स्मार्ट पॉईंट आणि सहकारी भंडार यासारख्या ठिकाणी धान्य टोकनचे वितरणही करीत आहे.

मुंबई, सिल्वासा, वडोदरा, पाताळगंगा, हजीरा, झज्जर, शहडोल, जामनगर, दहेज, बाराबंकी, नागोठाणे, गादीमोगा आणि होशियारपूर अशा रिलायन्स साइटवरील कर्मचारी स्वयंसेवक आपआपल्या ठिकाणी गरीब समाजात मोफत जेवण वाटप करीत आहेत. पश्चिम बंगाल, केरळ आणि ओडिशामधील काही विशिष्ट रिलायन्स पेट्रोल स्टेशनवरील कर्मचारी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱया ट्रकचालकांना मोफत जेवण वाटप करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या