ऑक्सीजन उत्पादनासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुढाकार; कोरोनाबाधित राज्यांना दररोज 700 टन ऑक्सीजनचा पुरवठा

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच अनेक रुग्णांना ऑक्सीजनची गरज भासत आहे. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. या परिस्थितीत रिलायन्सने पुढाकार घेत ऑक्सीजनचे उत्पादन आणि पुरवठा वाढवला आहे. रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीमध्ये दररोज 700 टनपेक्षा जास्त वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सीजनचे उत्पादन करण्यात येत आहे. ते 1000 टनपर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट्य आहे. कोरोनाबाधित राज्यांना या ऑक्सीजनचे वितरण मोफत करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना दिलासा मिळाला आहे.

जामनगर रिफायनरीमध्ये 100 टनपासून ऑक्सीजन निर्मितीला सुरुवात करण्यात आली. आता दररोज 700 टन ऑक्सीजन निर्मिती करण्यात येत आहे. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या गुजारात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांना हे ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे 70 हजार कोरोनाबाधित रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.

देशातील कोरोनाबाधितांना असलेली ऑक्सीजनची गरज लक्षात घेता रिलायन्सने हे ऑक्सीजन उत्पादन 1000 टनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जामनगरच्या रिफायनरीमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया करून त्यांचे पेट्रोल, डिझेल आणि विमनाच्या इंधनात रुपांतर करण्यात येते. मात्र, देशातील ऑक्सीजन तुटवड्याची समस्या लक्षात घेत या रिफायनरीत वैद्यकीय ऑक्सीजन निर्मिती करणारे यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे ऑक्सीजनचे उत्पादन वाढवण्यात आले आहे.

रिलायन्सकड़ून दररोज 700 टन ऑक्सीजन विविध कोरोनाबाधित राज्यांना मोफत देण्यात येत आहे. याच्या वाहतुकीसाठी शून्य अशांपेक्षा कमी तापमान असलेल्या विशेष टॅकरचा वापर करण्यात येत आहे. कंपनीने सामाजिक भावनेतून हे काम सुरू केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या