रिलायन्सचे कर्मचारी आणि कुटुंबीयांना दिले 10 लाखांहून अधिक लसींचे डोस

संपूर्ण देशभरात लसीकरणाचे प्रमाण हळूहळू वाढायला लागले आहे. खासगी संस्थांनीही त्यांचे सदस्य,  कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून देशभरात 10 लाखांहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. या फाऊंडेशनने लसीकरणासाठी ‘मिशन व्हॅक्सिन सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला होता. याद्वारे कर्मचारी वर्ग, सहयोगी, भागीदार आणि सर्वसामान्यांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.  गेल्या महिन्यात रिलायनन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. यामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सर्वसामान्यांचे लसीकरण करण्यासाठीचा निर्धार व्यक्त केला होता.

आजपर्यंत रिलायन्सच्या 98% पात्र लोकांना कोरोनावरील लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. ज्यांना लस देण्यात आली आहे त्यामध्ये कर्मचारी, सहयोगी, जॉइंट व्हेंचर भागीदार आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, ऑफ-रोल मनुष्यबळ, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्य यांचा समावेश आहे. फाऊंडेशनने लसीकरणासाठी देशभरात 171 लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या