रिलायन्सच्या नफ्यात सात टक्क्यांनी वाढ, जियोला कोट्यवधींचा नफा

86

सामना ऑनलाईन । मुंबई

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीला आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोट्यवधींचा नफा झाला आहे. एकट्या जियो कंपनीला 891 कोटींचा नफा झाला आहे.  

रिलायन्स उद्योग समुहाला चालू आर्थिक वर्षात 6.82 टक्क्यांनी नफा वाढला आहे. या वर्षात रिलायन्सला 10 हजार 104 कोटींचा नफा झाला आहे. तर जियोचा नफा पहिल्या तिमाहीत तब्बल 45.6 टक्क्यांनी वाढला असून कंपनीला 891 कोटींचा नफा झाला आहे.

रिलायन्स उद्योगसमुहाला पहिल्या तिमाहीत 9 हजार 550 कोटींचा नफा होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तेल ते टेलिकॉम सेवा पुरवण्यार्‍या रिलायन्सने गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत साडे नऊ हजार कोटींचा नफा कमावला होता.

जून 2019 पर्यंत कंपनीचा  महसूल 21.25 टक्क्यांनी वाढला असून दीड लाख कोटींच्या घरात पोहोचल आहे. 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रिलायन्सच्या पेट्रोकेमिकलला साडे सात हजार रुपयांचा नफा झाला आहे. 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत हा नफा 7 हजार 857 कोटी इतका होता.

आपली प्रतिक्रिया द्या