यंदाच्‍या उत्‍सवी हंगामासाठी नवीन उत्‍कला कलेक्‍शन, सोने व हिऱ्याच्‍या दागिन्‍यांची आकर्षक रेंज

Reliance Jewels

रिलायन्‍स ज्‍वेल्‍स या हिंदुस्थानच्‍या सर्वात विश्‍वसनीय ज्‍वेलरी ब्रॅण्‍डने उत्‍सवी हंगामाच्‍या शुभारंभानिमित्त आकर्षक दागिन्‍यांची रेंज ‘उत्‍कला’ सादर केली आहे. हे कलेक्‍शन ‘ओडिशा’च्‍या सांस्‍कृतिक परंपरांमधून प्रेरित आहे. या कलेक्‍शनमध्‍ये वैशिष्‍ट्यपूर्ण रचना, नमुना व डिझाइन्‍सचा समावेश आहे, ज्‍यामधून परिपूर्ण कलाकृती, परंपरा व संस्‍कृती दिसून येते.

या खास कलेक्‍शनमध्‍ये आकर्षक डिझाइन्‍सचा समावेश आहे. अत्यंत नाजूक, आकर्षक अशा डिझाइन करण्‍यात आलेल्‍या आणि काळजीपूर्वक बनवण्‍यात आलेल्‍या दागिन्‍यांमधून ग्राहक दागिन्यांची निवड करू शकतात. ही सर्वोत्तम कलाकृती प्रतिष्ठित कोनार्क सन मंदिर कला, मुक्‍तेश्‍वर मंदिर कला, पुरी जगन्‍नाथ मंदिर कला, सीन्‍थी नृत्‍यकला, बोइता बंधना सागरी वारसा आणि विदेशी पट्टाचित्रा चित्रकलेमधून प्रेरित आहे.

रिलायन्‍स ज्‍वेल्‍सच्‍या उत्‍कला कलेक्‍शनची झलक https://youtu.be/ioFuUaHX8Ck येथे पाहा.

चोकर सेट्सपासून लहान हार ते लांब गुंतलेल्या आणि मोहक हारांच्या सेटपर्यंत, विविध प्रसंगी आणि बजेट्सनुसार अनुकूल अशी एक रेंज आहे. गोल्‍ड कलेक्‍शनमधील डिझाइन्स 22 कॅरॅट सोन्यामध्‍ये तयार केल्या आहेत आणि त्यात पुरातन व पिवळ्या सोन्याच्या परिष्कृत तसेच पिवळ्या सोने व प्राचीन फिनिशमध्‍ये जटिल फिलीग्री शैलीमधील उत्कृष्ट दागदागिने समाविष्ट आहेत. उत्सवी आणि समकालीन लुक्‍ससाठी आकर्षक 18 कॅरॅट सोन्यात तयार केलेले डायमंड सेट आहेत.

या सादरीकरणाबाबत बोलताना रिलायन्‍स ज्‍वेल्‍सचा प्रवक्‍ता म्‍हणाला, ”दिवाळी हा भारतामध्‍ये जल्‍लोषात साजरा केल्‍या जाणा-या सणांपैकी एक सण आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आम्‍हाला उत्‍कला कलेक्‍शन सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आकर्षकरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेले हे कलेक्‍शन दागिन्‍यांच्‍या आमच्‍या डिझाइन वारसाला पुढे घेऊन जाते. प्रत्‍येक सोन्‍याचा व हि-याचा हार, इअररिंग्सची जोडी व सेट अद्वितीय आहेत आणि त्‍यामधून ओडिशाची परंपरागत संस्‍कृती व विविध कला दिसून येतात. धनत्रयोदशीच्‍या शुभप्रसंगानिमित्त सादर करण्‍यात आलेले हे कलेक्‍शन या सणाला अधिक खास बनवते. आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा व आनंद देत त्‍यांच्‍याद्वारे सन्‍मानित ब्रॅण्‍ड बनण्‍यास उत्‍सुक आहोत.”

उत्‍कला कलेक्‍शनमधील प्रत्‍येक दागिन्‍याचा सेट सर्वोत्तम कलाकृती आणि ब्रॅण्‍ड रिलायन्‍स ज्‍वेल्‍सचा अविरत दर्जा व विश्‍वासाला सादर करतो. उत्‍कला कलेक्‍शन भारतभरातील रिलायन्‍स ज्‍वेल्‍स आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. तसेच सोन्‍याचे दागिने व सोन्‍याची नाणी बनवण्‍याच्‍या शुल्‍कावर (घडणावळ) 30 टक्‍के सूटची स्‍पेशल ऑफर, डायमंड ज्‍वेलरी इन्‍वॉईस मूल्‍यावर जवळपास 30 टक्‍क्‍यांची सूट सर्व ग्राहकांना 16 नोव्‍हेंबर 2020 पर्यंत ऑफर करण्‍यात आली आहे. अटी व नियम लागू.

आपली प्रतिक्रिया द्या