रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरही बनणार आता कोरोना काळजी केंद्र – पालकमंत्री अस्लम शेख

1072

वांद्रे-कुर्ला संकुल येथिल रिलायन्स जिवो कन्वेंशन सेंटरचे रूपांतर कोरोना काळजी केंद्रात होणार आहे. मुंबई शहरचे पालक मंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी ही माहिती दिली. पालकमंत्री अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी शनिवारी जिओ कन्वेशन सेंटरची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत बृहन्मुबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

अस्लम शेख यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, पालिका उपायुक्त व अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत एक पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी जिओ कन्वेंशन सेंटरलाही भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना कोविड – 19 रुग्णालयासाठी रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार चालू असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

पालकमंत्री अस्लम शेख व आदित्य ठाकरे या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ कन्वेंशन सेंटरची 1500 रुग्णांची सोय होऊ शकेल एवढी क्षमता आहे. लवकरच या रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरच रुपांतर सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा कोरोना केअर सेंटर मध्ये होईल.

आपली प्रतिक्रिया द्या