जिओचा ग्राहकांना आणखी एक दणका, स्वस्तातील दोन प्लॅन केले बंद

3490

जिओ नेटवर्क व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नेटवर्कवर फोन करण्यासाठी प्रति मिनिट सहा पैसे आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिओने आता ग्राहकांना आणखी एक दणका दिला आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांच्या पसंतीतील 19 रुपये आणि 52 रुपयांचे दोन स्वस्तातील प्लॅन बंद केले आहेत. या दोन्ही प्लॅनची वैधता अनुक्रमे एक दिवस आणि सात दिवसांची होती.

जिओला टक्कर, वोडाफोन देणार 150 जीबी जादा डेटा

जिओ कंपनी 19 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेत कॉलिंग सेवा आणि 150 एमबी डाटा देत होती. तसेच 20 एसएमएसची सुविधाही देत होती. तर 52 रुपयांच्या रिचार्जवर सात दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह 1 जीबी डाटा आणि 70 एसएमएसची सुविधा देत होती. परंतु हे दोन्ही प्लॅन बंद केल्याने आता ग्राहकांना थेट 98 रुपयांचा कॉम्बो-पॅक रिचार्ज घ्यावा लागणार आहे.

याआधी जिओने ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर नक्की कधीपासून हे पैसे आकारले जातील याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु जिओने 9 ऑक्टोबरपूर्वी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना नवीन नियमानुसार पैसे द्यावे लागणार नाही. ते पूर्वीप्रमाणेच जिओव्यतिरिक्त इतर नेटवर्कवर फ्रीमध्ये कॉलिंगची सुविधा प्राप्त करणार आहेत. हा प्लान संपल्यानंतर मात्र त्यांना नवीन नियमानुसार पैसे द्यावे लागणार आहे. परंतु तोपर्यंत एकही पैसा कॉलिंगसाठी द्यावा लागणारन नाही, असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या