जीओची कमाल, सिल्वर लेक करणार 4 हजार 500 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक

731

रिलायन्स जिओ कंपनीची स्थिती सध्या ‘दसो उंगली घी मे’ अशी आहे. जीओत गुंतवणूक करण्यासाठी विदेशी कंपन्यांची रीघच लागली आहे. आता सिल्वर लेक या आधीच्या गुंतवणूक फर्मने पुन्हा रिलायन्स जीओत 4,546 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिओ प्लॅटफॉर्ममधील या कंपनीची भागीदारी 2.08 टक्के होणार आहे. सिल्वर लेकची जिओतील एकूण गुंतवणूक त्यामुळे 10,202.55 कोटी रुपये इतकी होणार आहे. याआधी 4 मे रोजी याच कंपनीने जीओत 5,655 कोटी रुपये गुंतवले होते जिओने आतापर्यंत 19.9 टक्के मालकी विकली आहे. त्यामुळे कंपनीची एकूण 92,202 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या