रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल गेले 9.54 लाख कोटींवर

310

ख्यातनाम उद्योजक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मंगळवारी चार टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 9.54 लाख कोटींवर गेले आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही हिंदुस्थानातील पहिली कंपनी ठरली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये यंदा 34 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर सेन्सेक्समध्ये याच कालावधीत 12 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचे बाजार भांडवल 18 ऑक्टोबरला 9 लाख कोटींवर गेले होते. तेव्हापासून कंपनीने बाजार भांडवलात आघाडी राखली आहे. बाजारात टीसीएस ही दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली असून तिचे बाजार भांडवल 7.91 लाख कोटींवर पोहोचले आहे.

टॉप फाइव्ह कंपन्या (भांडवल लाख कोटींमध्ये)

  • रिलायन्स इंडस्ट्रीज-9.57
  • टीसीएस-7.91
  • एचडीएफसी बँक-6.96
  • हिंदुस्थान युनिलिव्हर-4.40
  • एचडीएफसी-3.82
आपली प्रतिक्रिया द्या