व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया; मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

42

सामना ऑनलाईन । मुंबई

इंजिनिअरिंगसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी SEBC म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यात आणि वेळेत सादर करण्यात अडचणी येत आहे. विधानसभेमध्ये हा प्रश्न विरोधी पक्षाचे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी मांडला होता. या दोन्ही आमदारांनी मागणी केली की जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर जे टोकन मिळते ते प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जावे या प्रश्नाला उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले.

विनोद तावडे यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देताना घोषणा केली की विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जात प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येणार नाही. तावडे यांनी सांगितले की बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये SEBC च्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची सक्ती करून नये असे निर्देश देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या