कोरोनावर ‘बायोकॉन’चे इंजेक्शन,किंमत फक्त 8 हजार

952

कोरोनावर अद्याप प्रभावी औषध उपलब्ध झालेले नाही. बायोकॉन या कंपनीने कोरोनावर प्रतिबंधक इंजेक्शन बनवल्याचा दावा केला आहे. या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे. बायोकॉन ही बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या कंपनीने कोरोनावर ‘इटोलीझुमॅब’ हे इंजेक्शन बनवले आहे. सौम्य ते गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना ते देता येऊ शकते. केंद्रीय औषध नियंत्रकांनी त्यासाठी मंजुरी दिली आहे. कोरोनावर लस उपलब्ध होईपर्यंत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हे इंजेक्शन मदत करेल असा विश्वास कंपनीच्या प्रमुख किरण मुझुमदार-शॉ यांनी क्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या