उत्तम स्वास्थ्य आणि फिटनेसकरिता या आहारासंदर्भात 5 गोष्टी लक्षात ठेवा

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याकरिता पौष्टिक आहार कसा घ्यावा याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. कारण चुकीच्या माहितीला बळी पडून आरोग्य धोक्यात येऊ शकते. याकरिता उत्तम स्वास्थ आणि शरीराच्या फिटनेसकरिता या पाच गोष्टी लक्षात ठेवा.

– जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर शरीरातील कॅलरीज कमी करणे महत्त्वाचे असते. असे असले तरीही याव्यरिक्तही इतरही काही घटक वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे असतात. उदा. एखाद्या व्यक्तिचे हार्मोनल संतुलन बिघडलेले असेल किंवा हायपोथायराइडचा त्रास असेल तर याकरिता घेतलेल्या औषधांमुळेही वजन कमी-जास्त होऊ शकते. शरीराचे अतिरिक्त वाढलेले वजन कमी करण्याकरिता इतर घटकांबाबत विचार करायला हवा.

– काही जण आहारात मेदयुक्त पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणात करतात, मात्र अतिमेदयुक्त पदार्थ खाल्ले तर आरोग्यविषयक समस्याही निर्माण होऊ शकतात. मेदयुक्त पदार्थांचा समतोल आहार पाळायला हवा.

– ज्या लोकांना अधूनमधून उपवास करण्याची सवय असते ते लोक नाश्ता करणे टाळतात. अधूनमधून उपवास केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हे जरी खरे असले तरीही सकाळचा नाश्ता करणे हे दिवसभरात मिळणारी ऊर्जा आणि उत्साहाकरिता आवश्यक आहे. दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने खाल्ल्याने मेटाबॉलिजम वाढते आणि वजन कमी व्हायला मदत होते. ज्यांना मधुमेह किंवा इतर आजार आहेत त्यांनी थोड्या थोड्या वेळाने भूक लागेल तसे खावे. शरीराला ऊर्जा मिळण्याकरिता हे आवश्यक आहे.

– बाजारात मिळणारी मिठाई जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह किंवा दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित इतर काही आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्याऐवजी शक्यतो घरी केलेले गोड पदार्थ खावेत. अधिक साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा बाजारातील मिठाई खाणे जास्त धोक्याचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या